Thrill on National Highway in Akola! ST bus and truck hit hard; Fierce fire after accident

अकोल्यात नॅशनल हायवेवर अपघाताचा(Akola Accident) थरार पहायला मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग बाळापूरच्या शेळद या गावाजवळ बस आणि ट्रकचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात 14 जण जखमी झाले आहेत. बस चालकासह आणखी दोन ते तीन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर दोन्ही वाहने पेटल्याने प्रवाशी जखमी झाले आहेत.

    अकोला : अकोल्यात नॅशनल हायवेवर अपघाताचा(Akola Accident) थरार पहायला मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्ग बाळापूरच्या शेळद या गावाजवळ बस आणि ट्रकचा समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यात 14 जण जखमी झाले आहेत. बस चालकासह आणखी दोन ते तीन जण गंभीर जखमी आहेत. या अपघातानंतर दोन्ही वाहने पेटल्याने प्रवाशी जखमी झाले आहेत.

    या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक खोळंबली होती. जखमींना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
    शेळद फाट्याजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला. या अपघातात बसचालकाला गंभीर इजा झाली आहे. त्यासोबतच इतरही प्रवाशी जखमी झाले आहेत.

    दरम्यान, दोन वाहनाच्या धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला. यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी धडपड केली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचारासाठी पाठविले.

    तर, दोन्ही बाजूंची वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या अपघातातील जखमींची माहिती अद्याप कळू शकली नाही. तसेच बाळापूर पोलिस पुढील तपास करीत आहे.