विविध मागण्यांसंदर्भात एलआयसी अभिकर्त्यांचे कामबंद आंदोलन

अकोला येथील मुख्य शाखेत लियाफी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विनोद थुटे तसेच उपाध्यक्ष अरुण गावंडे, अकोला शाखा अध्यक्ष मनोज जोशी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात एलआयसी अभिकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कामबंद आंदोलन केले. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाचे शेवटचे काही दिवस बाकी असताना देखील उत्स्फूर्तपणे कामबंद दिवस पाळून मागण्यांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली.

    मूर्तिजापूर. भारतीय जीवन विमा कंपनी देशात अग्रगण्य कंपनी असून ग्राहक आणि प्रतिनिधी यांचे हित जोपासणाऱ्या अनेक मागण्यांच्या संदर्भात आज संपूर्ण देशात एलआयसी अभिकर्त्यांची लियाफी संघटनेद्वारा 23 मार्च रोजी कामबंद दिवस पाळण्यात येऊन लक्ष वेधण्यात आले. अकोला येथील मुख्य शाखा तसेच मूर्तिजापूर येथील सॅटेलाइट शाखेत अभिकर्त्यांनी कुठलेही काम न करता कामबंद दिवस पाळला व लवकरात लवकर एलआयसीने सदर मागण्यांच्या संदर्भात सकारात्मक पाऊल उचलावे, अशा अपेक्षा व्यक्त केल्या.

    अकोला येथील मुख्य शाखेत लियाफी संघटनेचे विभागीय अध्यक्ष विनोद थुटे तसेच उपाध्यक्ष अरुण गावंडे, अकोला शाखा अध्यक्ष मनोज जोशी यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात एलआयसी अभिकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत कामबंद आंदोलन केले. विशेष म्हणजे आर्थिक वर्षाचे शेवटचे काही दिवस बाकी असताना देखील उत्स्फूर्तपणे कामबंद दिवस पाळून मागण्यांच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. सदर मागण्यांमध्ये डायरेक्ट मार्केटिंग तसेच ऑनलाईन विमा विक्रीवर रिबेट बंद करणे, अभिकर्ता यांना कमिशनमध्ये आयआरडीआयद्वारा सांगितल्यानुसार कमिशन देणे, सीएलआय एजंटांना ब्रिगेड क्लबचे सदस्य झाल्यानंतर क्लब कोट्यातील शर्थीतून पूर्णपणे मुक्त करणे, एजंट क्लब कोट्यामधून 50 प्रतिशतची सूट देणे, अभिकर्ता अधिनियमामध्ये बदल करून

    शिक्षेमध्ये सुधार करून त्याच्यातली सक्ती कमी करणे, अभिकर्त्यांना देखील मेडिक्लेम विमा योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच त्यांच्या परिजनांचा यामध्ये सहभाग करण्यात यावा या व इतर मागण्यांचा यामध्ये समावेश आहे. मूर्तिजापूर येथील शिवाजी चौकात असलेल्या भारतीय जीवन विमा निगमच्या शाखा कार्यालयासमोर देखील कामबंद आंदोलन करण्यात आले. यामध्ये लियाफीचे उपाध्यक्ष किशोर गुप्ता, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख विलास नसले, विनोद कथलकर, अनिल घाटे, प्रवीण पिंजरकर, सुभाष धाये, अनिल ढेंगळे, विनोद कोठारी, राजविलास कोरडे, अक्षय खोत, अजय तेलमोरे, संजय शर्मा, दीपक बावनेर, सतीश कुर्मी, अमोल भागवतकर, वाकोडे, राजेश सगणे आदींचा समावेश होता.