धक्कादायक घटना, गर्भवती महिला अधिकाऱ्याची आत्महत्या, वरिष्ठांच्या जाचामुळं घेतला निर्णय

अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरिसाल क्षेत्रात दीपाली चव्हाण या RFO म्हणजे परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासकीय निवासस्थानीच त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अधिक तपासानंतर यातलं सत्य बाहेर येईल, असं सांगितलं जातंय.

    कामाच्या ठिकाणी कुणावर कशाचा दबाव असेल आणि कुणाची मनस्थिती कशी असेल, काही सांगता येत नाही. अमरावतीत वनविभागातील एका महिला कर्मचाऱ्याने स्वतःचं जीवन अचानक संपवल्यामुळे सर्वांनाच धक्का बसलाय. विशेष म्हणजे गरोदर असताना या महिलेनं स्वतःचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला.

    अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्रप्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या हरिसाल क्षेत्रात दीपाली चव्हाण या RFO म्हणजे परिक्षेत्र अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. शासकीय निवासस्थानीच त्यांनी स्वतःवर गोळ्या झाडून स्वतःचं आयुष्य संपवलं. त्यांच्यावर वरिष्ठांचा दबाव होता आणि वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. अधिक तपासानंतर यातलं सत्य बाहेर येईल, असं सांगितलं जातंय.

    सायंकाळी सात वाजता त्यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली. गेल्या दीड वर्षांपासून त्या मेळघाटमध्ये कार्यरत होत्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून आपण जीवन संपवत असल्याचा उल्लेख त्यात असल्याचं सांगण्यात आलंय. या प्रकरणाचा कसून तपास करण्याची मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांनी केलीय.

    सरकारी कामातदेखील वरिष्ठांच्या त्रासाची पातळी काय असू शकते, हे या घटनेतून सिद्ध झालंय. मात्र वरिष्ठांचा त्रास होत असेल, तर ही गोष्ट मनात न ठेवता तातडीने याला वाचा फोडून मनावरील ताण कमी करणे गरजेचे असल्याचं मत मनोविकार तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.