
अधिकारी मृत्यू प्रकरणात (Death Case) तिवशाचे गटविकास अधिकारी चेतन जाधव (Group Development Officer Chetan Jadhav) यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केले.
अमरावती : अमरावती जिल्ह्यातील तिवसा पंचायत समितील (Tivasa Panchayat Samiti in Amravati district) रोजगार हमी योजनेतील (Employment Guarantee Scheme) कंत्राटी तांत्रिक अधिकारी प्रमोद निंबुरकर यांच्या मृत्यू प्रकरणाला (Pramod Nimburkar Death Case) वेगळं वळण मिळत आहे.
अधिकारी मृत्यू प्रकरणात (Death Case) तिवशाचे गटविकास अधिकारी चेतन जाधव (Group Development Officer Chetan Jadhav) यांच्यावर कारवाई केली नाही तर स्वतः गटविकास अधिकाऱ्यांना फटके मारू अस वक्तव्य भाजप नेते व माजी कृषी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केले. बोंडे यांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालया समोर एका आंदोलनात हे भाषण केलं आहे. तिवशाचे गटविकास अधिकारी चेतन जाधव यांना कार्यालयात येऊन मारण्याची खुल्लम खुल्ला धमकी देणे ही बाब असंवैधानिक असल्याची चर्चा आहे.