विदर्भाच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या ‘स्काय वॉक’ प्रकल्पाला केंद्राकडून हिरवा कंदील!

चिखलदरा येथे हरिकेन ते गोराघाट या पॉइंट दरम्यान  407 मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबलवरील सर्वात मोठा स्काय वॉक सिडकोच्या वतीने साकारला जात आहे. सिडकोने चिखलदरा आणि अमरावती येथील वन विभाग, व्याघ्र प्रकल्प विभागाची परवानगी घेऊन या प्रकल्पाला सुरूवात केली. आता केंद्राने परवानगी दिल्याने लवकरच हा प्रकल्प पुर्णत्वास जाणार आहे.

    अमरावती – विदर्भाचं नंदनवन म्हणून ओळखं जाणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील चिखलदऱ्याची (chikhaldara skywalk) ओळख जागतिक पटलावर होणार आहे. चिखलदरा येथील स्काय वॉकच्या विकासाला केंद्र शासनानं परवानगी दिली आहे. त्यामुळे आता स्काय वॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे

    जगात स्वीझरलँड आणि चायना या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चायनाचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे. तर, चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्काय वॉक ४०७ अधिक १५ मीटर म्हणजे सर्वात मोठा लांबीचा असणार आहे. आता या स्काय वॉकचं काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत. स्काय वॉकच्या विकासाला केंद्र शासनाने परवानगी दिली आहे. पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्यात याबाबत एक बैठक झाली होती. या बैठकीत स्काय वॉकला केंद्र शासनाकडून परवानगी मिळण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा करण्याची मागणी पालकमंत्र्यांनी केली होती. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून केंद्र सरकारची परवानगी प्राप्त झाली आहे. त्यामुळे आता स्काय वॉक विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    (chikhaldara skywalk) काम सुरू झाले. विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून देशातील पहिला व आशिया खंडातील तिसऱ्या असा नावीन्यपूर्ण असलेल्या स्काय चिखलदरा येथील स्काय वॉक प्रकल्प देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केला होता. मात्र, केंद्राच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने (Union Ministry of Forests and Environment) या स्काय वॉकमध्ये त्रुट्या काढून तुर्तास रद्द केला होता.