धान्य, किराणा व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी; मर्चंट असोसिएशनने घेतले शिबिर

होलसेल किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद सोमानी, मनोज खंडेलवाल, चेंबरचे अध्यक्ष विनोद कलंत्री आणि संघटनेचे सचिव प्रशांत अग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रशांत अग्रवाल यांनी केले. आयुक्त प्रशांत रोडे, चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन व मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. संदीप पाटबागे यांचे आभार व्यक्त केले.

    अमरावती. शहरातील ग्रेन मर्चंटनी कोरोना चाचणी शिबिराचे आयोजन केले होते. चेंबर ऑफ अमरावती महानगर मर्चंट अॅण्ड इंडस्ट्रीज अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन आयुक्त प्रशांत रोडे यांच्या हस्ते माहेश्वरी भवन येथे मंगळवार, 22 मार्चला झाले. यावेळी मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन उपस्थित होते.

    होलसेल किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गोविंद सोमानी, मनोज खंडेलवाल, चेंबरचे अध्यक्ष विनोद कलंत्री आणि संघटनेचे सचिव प्रशांत अग्रवाल यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रशांत अग्रवाल यांनी केले. आयुक्त प्रशांत रोडे, चेंबरचे अध्यक्ष सुरेश जैन व मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. संदीप पाटबागे यांचे आभार व्यक्त केले. शहरात कोरोनाची स्थिती बिकट होती. जवळपास एक हजार रुग्ण दररोज निघत होते.

    त्यामुळे लॉकडाऊन लावण्याची वेळ आली होती. त्यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग असल्याने सर्वांनी कोरोना चाचणी करणे गरजेचे आहे. या प्रसंगी अशोक राठी, बकुल कक्कड, सुदीप जैन, होलसेल किराणा व ग्रेन असोसिएशनच्या वतीने विजय मकडा, रवी शेठ, गौतम सकलेचा, अनिल नागलिया, बालकिशन बसंतवाणी, किरण सावरकर, हरीश देम्बला, राजेश नागलिया, राजेश मित्तल, प्रकाश काकानी उपस्थित होते.