कमी लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीनं प्रशासनाकडनं खेचून आणला विकासनिधी

    अमरावती (Amravati) : वणी (Wani) या छोट्याश्या ग्रामपंचायतीनं काम मात्र मोठं केलंय. 1014 लोकसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीनं (gram panchayat) थोडा थोडका नव्हे तर तब्बल 4 कोटी रूपयांचा विकासनिधी मिळवलाय.

    सरपंच मुकुंद पुनसे यांचा संघर्ष हे यामागचं प्रमुख कारण आहे. पुनसे यांनी विकासनिधी मिळावा यासाठी प्रसंगी अन्नत्याग आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला दिला होता. मुकुंद पुनसे यांच्या या गांधीगिरीचं सर्वत्र कौतुक होतय.