रझा अकादमी कुणाचं पिल्लू आहे हे सर्व जनतेला माहित! बंदी घालण्याची हिंमत आहे का? देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला सवाल

रझा अकदामी काँग्रेसच्या कार्यकाळातच हल्ले का करते? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसी यांनी केला आहे. रझा अकादमी ही कुणाची ए आणि बी टीम आहे हे सर्वांना माहित आहे असेही ते म्हणाले. रझा अकादमी भाजपाचे पिल्लू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. सरकारची हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी. भाजपा बंदीची मागणी करते असे फडणवीस म्हणाले(Devendra fadnavis demands ban on Raza Academy). रझा अकदामीवर बंदी घालण्याची सरकारची हिंमत आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

    अमरावती : रझा अकदामी काँग्रेसच्या कार्यकाळातच हल्ले का करते? असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसी यांनी केला आहे. रझा अकादमी ही कुणाची ए आणि बी टीम आहे हे सर्वांना माहित आहे असेही ते म्हणाले. रझा अकादमी भाजपाचे पिल्लू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला होता. सरकारची हिंमत असेल तर रझा अकादमीवर बंदी घालावी. भाजपा बंदीची मागणी करते असे फडणवीस म्हणाले(Devendra fadnavis demands ban on Raza Academy). रझा अकदामीवर बंदी घालण्याची सरकारची हिंमत आहे का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

    दंगलीनंतर फडणवीस यांनी अमरावतीचा दौरा करत दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या वरही निशाणा साधला. यशोमती ठाकूर या १३ तारखेच्या दंगलीविषयी बोलतात, मात्र १२ तारखेच्या दंगलीविषयी का बोलत नाहीत? त्यातून त्यांचे मतदार कमी होण्याची त्यांना भीती वाटते का असा सवालही फडणवीसांनी केला आहे. अशा प्रकारचे मोठे मोर्चे आणि हिंसाचार हे पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा आरोपही त्यांनी केला.  सर्वसामान्य माणसांवर झालेला अत्याचार सहन केला जाणार नाही आणि आम्ही मार खाणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.

    फडणवीस यांची पत्रकार परिषद भावना भडकवण्याचा प्रयत्न – यथोमती ठाकूर

    देवेंद्र फडणवीसांच्या पत्रकार परिषदेतील आरोपांना पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी उत्तर दिले आहे. १२ आणि १३ या दोन्ही दिवशी घडलेले प्रकार हे दुर्दैवी असून, यात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई होणारच अशी भूमिका त्यांनी मांडली. फडणवीस यांच्या पत्रकारा परिषदेतून भावना भडकवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ध्रुवीकरण झाले की फायदा कुणाला होतो, हे साऱ्या देशाला माहिती असल्याचे सांगत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले.  अमरावती दंगलींनंतरही हा मुद्दा आता राजकीय होत चालल्याचे या सर्व प्रकरणांतून दिसत आहे. आगामी काळातही याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.