100 दलितांनी जातीय अत्याचाराच्या निषेधार्थ सोडले गाव; जातीय द्वेषाचा दंश सहवेना !

दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे ....

    अमरावती (Amravati): चांदुर रेल्वे (Chandur railway) तालुक्यातील दानापूर (Hundreds of dalits from Danapur) येथील जातीय द्वेषातून होणाऱ्या अत्याचाराच्या (the atrocities perpetrated by ethnic hatred) निषेधार्थ दानापूर येथील शंभर दलितांनी शुक्रवार 22 ऑक्टोंबरला गाव सोडून निषेध केला आहे. या बांधवांनी गावालगतच्या पाझर तलावावर आपले ठाण मांडले असून, पून्हा गावात परतणार नाही असे निर्णय घेतला आहे. त्यामुळे गावातील त्यांच्या मालमत्तेच्या (property) संरक्षणाची जबाबदारी ही प्रशासनाची राहील, असे त्यांनी लेखी प्रशासनाला कळविले आहे.

    वाद कशावरून ?
    दानापूर येथील दलित बांधवाची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदणच्या एक शेत पलीकडे या दलितांची शेती आहे. परंतु गावच्या सवर्णांनी या दलितांना त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवुन त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप दलित बांधवांचा आहे.यावेळी तहसीलदार,पोलिस प्रशासनाने या घटाना स्थळी भेट देवून या घटनेवर तोड़गा काढण्या साठि भेट दिली आहे.