कार झाडावर धडकल्याने पाच जखमी; सुदैवाने मोठा अपघात टळला

अजमेरवरून अमरावतीला परत येणारी भरधाव कार सोमवारी बडनेरा रोडवरील बेलोऱ्याजवळ अनियंत्रित होऊन एका झाडावर आदळली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

    अमरावती (Amravati).  अजमेरवरून अमरावतीला परत येणारी भरधाव कार सोमवारी बडनेरा रोडवरील बेलोऱ्याजवळ अनियंत्रित होऊन एका झाडावर आदळली. या अपघातात पाच जण जखमी झाले असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    पोलिस सुत्रानुसार, गौसनगरातील रहिवासी तौसिफ प्यारू मोहम्मद अली हे कुटुंबीयांसह कार क्रमांक एमएच बीझेड 9023 ने अजमेर शरीफ येथे गेले होते. तेथून परत येत असताना, बेलोरा गावासमोरील बडनेरा पॉवर हाउसजवळ अचानक कारचालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्यालगतच्या झाडावर जाऊन आदळली. या अपघातात कारमध्ये बसलेले पाच जण किरकोळ जखमी झाले. त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेच्या माहितीवरून बडनेरा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.