धक्कादायक – पोटे अभियांत्रिकी महाविद्यालयात ४ कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू ,अमरावतीमध्ये उडाली खळबळ

अमरावतीच्या पोटे महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचाऱ्यांचा शॉक (4 Dead In Electric Shock At Pote Engineering College of Amravati) लागून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    अमरावती: भाजपचे नेते आणि माजी राज्यमंत्री आमदार प्रवीण पोटे  (Pravin Pote) यांच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात आज भयानक घटना घडली आहे. अमरावतीच्या पोटे महाविद्यालयात रंगरंगोटी करत असताना चार कर्मचाऱ्यांचा शॉक(4 Dead In Electric Shock At Pote Engineering College of Amravati) लागून जागीच मृत्यू झाला. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    अमरावतीत प्रवीण पोटे यांचं पीआर पोटे इंजिनीयरिंग महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील कर्मचारी महाविद्यालयाच्या मुख्य गेटची शिडीवर चढून रंगरंगोटी करत होते. या गेटजवळून हायपॉवरची वायर गेली आहे.  रंगरंगोटी करत असताना शिडीला विद्युत तारेचा स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना भयंकर शॉक लागला. त्यामुळे हे चारही कर्मचारी शिडीला चिकटले. त्यानंतर जोराचा झटका बसल्याने हे चारही कर्मचारी खाली कोसळले.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चारही जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. चारही मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून हे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.