अचलपूर पंसत महाआवास अभियानाला प्रारंभ; घरकुल मंजुरीसाठी प्रशासन लाभार्थ्यांच्या दारी

अचलपूर पंचायत समिती अंतर्गत घरकुलदूतांची नियुक्ती करीत त्यांना गावनिहाय यादीनुसार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्याचे लक्ष्य दिले आहे. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत निर्देश देण्यात आले. घरकुलदूत प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेऊन घरकुल बांधकामाच्या अडचणी जाणून घेणार आहेत.

    परतवाडा. ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांचे स्वप्न पूर्णत्वास जावे याकरिता महाराष्ट्र सरकारच्या ग्रामविकास विभागाकडून घरकुल योजना पूर्णत्वास येत आहे. जिल्हा परिषदेने महाआवास अभियान ग्रामीण 2020 च्या अंमलबजावणीकरिता ‘प्रशासनाची वारी घरकुल मंजुरीसाठी लाभार्थ्यांच्या दारी’ आरंभ केली आहे. 22 मार्च रोजी अचलपूर पंचायत समितीअंतर्गत घरकुलदूतांच्या माध्यमातून लाभार्थ्यांची माहिती संकलित करण्यात आली. घरकुल  प्रस्ताव तयार करण्याच्या  प्रक्रियेला गती देण्यात आली.

    अचलपूर पंचायत समिती अंतर्गत घरकुलदूतांची नियुक्ती करीत त्यांना गावनिहाय यादीनुसार लाभार्थ्यांची संख्या निश्चित करण्याचे लक्ष्य दिले आहे. लाभार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत निर्देश देण्यात आले. घरकुलदूत प्रत्यक्ष लाभार्थ्यांची भेट घेऊन घरकुल बांधकामाच्या अडचणी जाणून घेणार आहेत. शिवाय प्रपत्र अ, ब, क मध्ये नोंद घेत त्यावर लाभार्थ्यांची स्वाक्षरी घेतली जाणार आहे. जागेबाबत अडचण समजून घेत ई क्लास जागेतून मागणी करता येणार आहे. अन्‍यथा पंडित दीनदयाल योजनेअंतर्गत जागा विकत घेण्यासाठी 50 हजारांची मदत केली जाणार आहे. खाली पक्के घर असल्यास त्यावर घरकुल बांधता येईल. कमी जागा असल्यास दुमजली बांधता येईल, अशा प्रकारचे समुपदेशन घरकुलदूतांनी केली.

    पंचायत समितीत घरकुल कक्ष

    घरकुलदूत ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, रोजगारसेवक आदींचा सहभाग करून घेतला. अचलपूर तालुक्यात हे अभियान राबविण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांना काही अडचणी असल्यास पंचायत समितीचा घरकुल कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या योजनेला गती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या निर्देशानुसार जलदिनाचे औचित्य साधत लाभार्थ्यांकडून घरकुल बांधकामाबाबत अडचणी जाणून घेतल्या.

    जयंत बाबरे, गटविकास अधिकारी