मेळघाटातील मोहफूलातून उन्हाळ्यात मिळतो रोजगार

मेळघाट हे अतिदुर्गम क्षेत्र असून याठिकाणी आदिवासी बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील बांधव हे कामाच्या शोधात इतर भागामध्ये स्थलांतरीत होत असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये मेळघाटातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर मोहफुले येतात. या मोहफुलातून स्थानिक आदिवासी बांधवांना दरवर्षी रोजगार उपलब्ध होत असतो. आदिवासी बांधव ही मोहफुले वेचून त्याला सुकवून बाजारात विक्री करतात.

  • आदिवासी बांधवांकरिता मोहफुले महत्त्वाची

धारणी.  मेळघाटमध्ये रोजगाराच्या संधी कमी असल्याने, येथील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणावर रोजगारासाठी इतर ठिकाणी स्थलांतरीत होत असतो. मात्र उन्हाळ्यात मेळघाटातील बांधवांसाठी मोहफुले महत्त्वाची ठरतात. कारण याच मोहफुलातून स्थानिक आदिवासी बांधवांना दरवर्षी उन्हाळ्यात रोजगार प्राप्त होत असतो.

मेळघाट हे अतिदुर्गम क्षेत्र असून याठिकाणी आदिवासी बांधवांची संख्या ही मोठ्या प्रमाणावर आहे. याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने येथील बांधव हे कामाच्या शोधात इतर भागामध्ये स्थलांतरीत होत असतात. परंतु उन्हाळ्यामध्ये मेळघाटातील जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर मोहफुले येतात. या मोहफुलातून स्थानिक आदिवासी बांधवांना दरवर्षी रोजगार उपलब्ध होत असतो. आदिवासी बांधव ही मोहफुले वेचून त्याला सुकवून बाजारात विक्री करतात. या फुलांना बाजारातही मोठ्या प्रमाणावर मागणी असते. मेळघाटातील गावांमध्ये प्रवेश करताच प्रत्येक घरासमोर मोहफुले सुकायला टाकलेली दिसून येतात. तर कुठेकुठे घराच्या छतावरही मोहफुले सुकवत ठेवलेली दिसून येतात. मोहफुले मेळघाटातील महत्त्वपूर्ण होळी या सणानिमित्त मेळघाटवासींना अत्यंत मोलाची ठरतात. मोहफुले विकून मेळघाटवासी आपला होळी सण साजरा करतात. मेळघाटात ज्यांना रोजगार उपलब्ध होत नाही त्या नागरिकांकरिता मोहफुले अत्यंत महत्त्वाची ठरतात.