MP Navneet Rana with ST staff

आज अमरावतीत राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात 500 पेक्षा अधिक कुटुंबीयांनी सहभाग घेतला आहे.

    अमरावती : बऱ्याच काळापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. वाटाघाटीच्या अनेक प्रयत्नानंतरही हा संप संपविण्यास अजूनही यश आलेले नाही. एसटी कर्मचारी हा संप अधिकाधिक तीव्र करण्याचा प्रयन्त करीत आहे. यात ते आता सहपरिवार उतरलेले आहे. तर, त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे. विशेष म्हणजे या मोर्चाचे नेतृत्व खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. 

     

    एसटीचे विलीनीकरण ही प्रमुख मागणी असणाऱ्या अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आपला जीव या दरम्यान गमावला आहे. अशी परिस्थिती आपल्या परिवारावर ओढवू नये, म्हणून या विलीनीकरणाच्या लढ्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनीही सहपरिवार सहभाग घेतला आहे.

    आजच्या मोर्चाची विशेष बाब अशी की, यात महिला आणि लहान मुल मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहे. तसेच, या मोर्चाचे नेतृत्व युवा स्वाभिमान पार्टीचे आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी केले आहे. या प्रसंगी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन करून शासनाचे लक्ष या संपाकडे वेधण्याचा प्रयन्त एसटी कर्मचारी करीत आहे. यावेळी, कर्मचारी आणि त्यांच्या परिवारांमध्ये प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होतील या अपेक्षेने कर्मचारी विविध तर्हेने प्रयत्न करीत आहे.