Nand Ganpati Sangrahalaya recorded in India Book of Records, 2544 Ganpati idols stored at Chikhaldara

विदेशातील इंडोनेशिया, बँकॉक, सिंगापूर, चायना, नेपाळ, भूतान, तिबेट तसेच लाकडी कोरीव काम केलेले गणपती काश्मीर, राजस्थान, व उत्तर प्रदेशातून त्यांनी संग्रहित केले. भारतातील प्रमुख समुद्राच्या वाळूचे गणपती यांचा समावेश आहे.

    अकोला : प्रदीप नंद यांनी सर्वाधिक आगळ्या-वेगळ्या, नाविन्यपूर्ण २५४४ गणपती मुर्त्या संग्रहित करून चिखलदरा येथील पर्यटन स्थळी संग्रहित केल्या आहे. विशेष म्हणजे या मूर्तीचे त्यांनी चार भव्य दालनामध्ये गणपती संग्रहालय सुरु केले आहे. त्याची रविवार १३ मार्च २०२२ रोजी Maximum collection of Ganesh Idols, Different Size and Varieties या शीर्षका अंतर्गत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस‍्ने नोंद केल्याची माहिती पञकार परिषदेत देण्यात आली.

    इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड‍्स संस्थेकडून त्यांचे प्रतिनिधी संग्रहालयाची पाहणी करण्यासाठी नागपूरच्या डॉ. सुनिता धोटे आल्या होत्या. संग्रहालयाची अतिशय बारकाईने तपासणी करून नंद यांच्याकडून सर्व गणपतीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर लगेच एक छोटासा बक्षीस समारंभ डॉ. सुनिता धोटे यांच्या हस्ते संपन्न झाला. प्रदीप नंद आणि दीपाली नंद हे अकोल्याचे रहिवासी असून, त्यांनी ३० वर्षात २ हजार ५४४ गणपती संग्रहित केले. 

    या संग्रहित गणपतींमध्ये पितळ, तांबा, काच, फायबरचे गणपती आहेत. अतिशय सूक्ष्म म्हणजे दुर्बीणमधून पाहण्यासारखे गणपती मोहरीवर, तिळावर, तांदळावर, गव्हावर, साबुदाण्यावर, दुर्वेवर, पेन्सिलच्या टोकावर, माचिसच्या काडीच्या गुलावर पेंटिंग तथा कोरलेले गणपती, खडूंवरील गणेश शिल्प, औषधाच्या गोळ्यांचा गणपती, पेन्सिलचा गणपती, बटनांचा गणपती, पानांचा गणपती, मेणबत्तीचा गणपती, भुश्याचा गणपती, शिंपल्याच्या आतील गणपती, पर्यावरण संदेश देणारा गणपती, व्यास मुनी भागवत सांगताना व लिहिणारा गणपती, रुद्राक्षाचा गणपती, आदिवासींच्या कल्पनेतील गणपती, फुलांच्या पाकळ्यांचा गणपती, वाहन चालवितानाचा गणपती, मोटारसायकल व कार चालवितानाचा गणपती, बैल बंडी चालवतानाचा गणपती, विविध खेळ खेळतानाचे गणपती उदा. बुद्धिबळ, कुरघोडी, कबड्डी, खोखो, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबलटेनिस, फुटबॉल इत्यादि सोबत विविध पारंपरिक सर्व वाद्य वाजवतानाचे गणपती, सर्वात महत्वाचे टिळक गणपती, संविधान हातात घेतलेला गणपती, रुग्ण तपासतांना गणपती, विविध देवतांच्या अवतारातील भारतातील सर्व राज्यांचे गणपती, अतिशय बारीक कोरीव काम केलेले गणपती, दगडावरील गणपती संकलित केले. विदेशातील इंडोनेशिया, बँकॉक, सिंगापूर, चायना, नेपाळ, भूतान, तिबेट तसेच लाकडी कोरीव काम केलेले गणपती काश्मीर, राजस्थान, व उत्तर प्रदेशातून त्यांनी संग्रहित केले. भारतातील प्रमुख समुद्राच्या वाळूचे गणपती यांचा समावेश आहे.

    यातून नवीन पिढीला धार्मिक, वैज्ञानिक, सांस्कृतिक, संदेश मिळेल असा संदेश आतापर्यंत संग्रहालयाला भेट देणाऱ्या ४००० पर्यटकांनी लिहिले आहे. संग्रहालय हे तीन एकरात असून, हे चिखलदऱ्याचा घाट संपल्यानंतर डाव्या हाताला आहे. या सर्व गणपतींच्या कला, रूपे, अवतार, एकाच छताखाली पर्यटकांना उपलब्ध असल्यामुळे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या संस्थेने हा अवार्ड प्रदीप नंद यांना दिला आहे, असेही पञकार परिषदेत सांगण्यात आले. यावेळी प्रदीप नंद, दीपाली नंद, डॉ. माधव देशमुख, इंद्राणी देशमुख यांची उपस्थिती होती.