उपसंचालक कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित; लोकप्रतिनिधींचा धाक संपला

विजेचे बिल न भरल्याने दोन दिवसा आधीच अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वीज कापण्यात आली आहे. लाईन नसल्याने कर्मचारी जागेवर नसल्याचे चित्र कार्यालयात आहे. येणारे शिक्षक मात्र हेलपाटे घालत आहे.

    अमरावती (Amravati).  विजेचे बिल न भरल्याने दोन दिवसा आधीच अमरावती शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वीज कापण्यात आली आहे. लाईन नसल्याने कर्मचारी जागेवर नसल्याचे चित्र कार्यालयात आहे. येणारे शिक्षक मात्र हेलपाटे घालत आहे. प्रशासन सुस्त असून याच्या त्रास अमरावती, अकोला, बुलढाणा वाशिम व यवतमाळ या पाचही जिह्यातील शिक्षक व कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांना होत आहे. या निषेध माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांनी केला आहे.

    गत सहा सात वर्षात अशी वेळ या कार्यालयावर कधीच आली नाही. कारण, त्या वेळी प्रतिनीधिचा धाक, प्रतिनिधींची कामे करण्याची पद्धत व वेळोवेळी घेतले जाणारा पाठपुरावा महत्वाचा ठरत होता. परंतु नव्याने निवडून आलेले अमरावती शिक्षक मतदार संघाचे आमदार किरण सरनाईक यांनी पूर्ण पणे शिक्षण विभाग, शिक्षकांचे प्रश्न व शिक्षकांना वार्यावर सोडले आहे. गत तिन महिन्यांपासून हे चित्र दिसून येत आहे. असा निष्क्रीय लोक प्रतिनिधींच्या धाक संपला की अशीच बत्ती गुल होत असल्याची बोचरी टीका शिक्षक आघाडीचे विभागीय प्रसिद्धी प्रमुख रविंद्र सोळंके यांनी केली आहे.

    त्रास सहन केला जाणार नाही
    शिक्षण उपसंचालक कार्यालयातील वीज कट झाल्याचे समजले. त्यामुळे कर्मचारी जागेवर नाही आणि शिक्षकांना विनाकारण हेलपाटे घालावे लागत आहे. ही बाब निंदनीय आहे. शिक्षकांना होणारा त्रास सहन केला जाणार नाही असे माजी आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे म्हणाले.