अमरावतीमध्ये हिंसाचारानंतर मुस्लिम बांधवांकडून शिव मंदिरांचे रक्षण

    अमरावती (Amravati) : मध्ये नुकताच हिंसाचार झाला,यात काही ठिकाणी हिंदूची मंदिर तर राजकमल चौकातील मुस्लिमांचा दर्गा तोडण्यात आला. मात्र मुस्लिम बहुल भागात असलेल्या हबीब नगर येथील शिव मंदिर व अन्य हिंदूंची २ मंदिरांचे २४ तास रक्षण गेल्या ७ दिवसांपासून त्या भागातील २०-२५ मुस्लिम बांधव करत आहेत.

    या मंदिराची सुरक्षा मुस्लिम बांधव करत असल्याने कोणताही पोलिस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आला नाही.