
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सराकरमधील मंत्र्यांविरोधात रान उठवले आहे. येत्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार आहे. त्यात शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे, असे सोमय्या यांनी जाहीर केले. मात्र, त्यांनी या चारही मंत्र्यांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे(Scams of four ministers will be brought out; Kirit Somaiya's push continues).
अमरावती : भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सराकरमधील मंत्र्यांविरोधात रान उठवले आहे. येत्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या चार मंत्र्यांचे घोटाळे उघड करणार आहे. त्यात शिवसेनेचे दोन आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रत्येकी एका मंत्र्याचा समावेश आहे, असे सोमय्या यांनी जाहीर केले. मात्र, त्यांनी या चारही मंत्र्यांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे(Scams of four ministers will be brought out; Kirit Somaiya’s push continues).
विदर्भातील कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश
अमरावतीतील पत्रपरिषदेत सोमय्या म्हणाले की, पुढच्या काही दिवसात ठाकरे सरकारच्या चार नेते, मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार आहे. या चारही मंत्र्यांविरोधातील तक्रारी विविध तपास यंत्रणांना दिल्या आहेत. या चार मंत्र्यांमध्ये दोन शिवसेनेचे आहेत. एक मुख्यमंत्री मित्र परिवारातील महत्त्वाचा सदस्य आहे. दुसऱ्याचे वर्णन करत नाही. दोन्ही मुख्यमंत्री मित्र परिवारातील सदस्य आहेत. त्यापैकी एक कॅबिनेट मंत्री आहे. तसेच काँग्रेसच्या विदर्भातील कॅबिनेट मंत्र्याचाही यात नंबर आहे. त्याचीही फाईल आली आहे. एजन्सीकडे कागदपत्रे पाठवली आहे. चौथे राष्ट्रवादीचे मंत्री आहेत, असे सोमय्यांनी सांगितले. सोमय्यांना या मंत्र्यांची नावे सांगतली नाही. केवळ हिंट दिल्या आहेत. त्यामुळे हे मंत्री कोण? याबाबतचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
31 डिसेंबरपर्यंत 40 घोटाळे
ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जनतेने मला जबाबदारी दिली आहे. गेल्या 12 महिन्यात या सरकारचे 100 घोटाळे बाहेर काढण्यात आले आहेत. त्यातील 24 मोठ्या घोटाळ्यांचा हिशोब दिला आहे. अर्धा डझन मंत्री आणि अधिकारी सध्या जामिनावर आहेत. येत्या 31 डिसेंबरपर्यंत आम्ही 40 घोटाळे उघड केलेले असतील. आतापर्यंत 28 घोटाळे उघड करण्यात आले असल्याचे सोमय्या म्हणाले.