अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची पोलिस ठाण्यातच आत्महत्या

    अमरावती (Amravati): अमरावती पोलीस आयुक्त कार्यालयाच्या हद्दीत असलेल्या वलगाव पोलीस ठाण्यात एका ५० वर्षीय आरोपीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अरुण बाबाराव जवनजाळ (वय ५० रा.आष्टी) असं मृतक आरोपीचं नाव आहे.

    एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या प्रकरणात अरुण जवनजाळ याला वलगाव पोलिसांनी दुपारी ताब्यात घेतलं होतं; मात्र सायंकाळच्या सुमारास त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

    या घटनेनंतर वलगाव पोलीस ठाण्याबाहेर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात केला होता. दरम्यान, महिन्याभरापूर्वीच राजापेठ पोलीस ठाण्याच्या कोठडीत एका २३ वर्षीय आरोपीने आत्महत्या केली होती. त्यानंतर गुरुवारी ही दुसरी घटना घडल्याने पोलिसांच्या वर्तुळातही खळबळ उडाली आहे.