धारदार शस्त्राने भोकसून सामाजिक कार्यकर्त्याची हत्या; मारेकऱ्याचाही मृत्यू

ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत (rural police station) येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर (Samsherpur) येथे एका ३५ वर्षीय युवकाची हत्या (killed) करण्यात आली. घटना ३० जून रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली.

    मूर्तिजापूर (Murtijapur) :  ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत (rural police station) येत असलेल्या तालुक्यातील समशेरपूर (Samsherpur) येथे एका ३५ वर्षीय युवकाची हत्या (killed) करण्यात आली. घटना ३० जून रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडली. धम्माल उर्फ आदेश महादेव आटोटे (Dhammal / Aadesh Mahadev Atote) असे मृतकाचे नाव आहे. यामध्ये मारेकऱ्याचाही मृत्यू झाला आहे.

    धम्माल उर्फ आदेश आटोटे हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून परीचीत होता तो औरंगाबाद येथे वास्तव्यास होता, भाच्याच्या लग्नासाठी २९ जून रोजी गावी आला होता, आरोपी दिपकराज डोंगरे (५५) राहणार प्रतिक नगर मूर्तिजापुर हा २९ तारखे पासून धम्माल याच्या मागावर होता. परंतु ३० जून रोजी दिपकराज डोंगरे याने धम्माल याला घरीच समशेरपूर येथे गाठून त्या पोटात चाकूने व कोयत्याने वार केले. त्यात धम्माल याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

    मृतकाचा मोठा भाऊ मधात सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या उजव्या हातावर चाकू लागल्याने तो जखमी झाला. तर आरोपी दिपकराज डोंगरे हा गंभीररीत्या जखमी झाला. पुढील उपचारासाठी त्याला अकोला येथे पाठविण्यात आले होते. तेथे त्याचा मृत्यू झाला. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी कुठलाही गुन्हा दाखल झालेला नव्हता.