हॉटेलसमोर बर्निंग कारचा थरार; चौघांचीही झाला असता कारमध्येच ‘कोळसा’

    अमरावती (Amaravati). येथील परतवाड्यातील हॉटेल कैलास पॅलेससमोर (Hotel Kailas Palace) बर्निंग कारचा (a burning car) थरार पाहायला मिळाला. अचलपूरकडे जाणाऱ्या परिवाराला बर्निंग कारचा सामना करावा लागला. कैलास हॉटेलचे संचालक दीपक चौरसिया यांच्या समयसूचकतेमुळे चौघांचेही प्राण बचावले. परतवाड्यातील रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ थांबले असता कारमधून धूर निघत असल्याचं लक्षात आलं.

    गाडीने अचानक पेट घेतल्यावर चौरसिया यांनी सतर्कपणा दाखवत कार विझवण्याचा प्रयत्न केला.वाहनातून तीन स्त्रीया व एक पुरुष यांना बाहेर काढण्यात आलं. आग विझत नसल्यानं चौरसिया यांनी आपल्या हॉटेलमधील अग्निशमन बंबाने आग विझवण्यात आली. समयसूचकता दाखवणाऱ्या हॉटेल संचालक आणि स्टाफचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.