अनिलकुमार सौमित्र, प्राध्यापक, आयआयएमसी
अनिलकुमार सौमित्र, प्राध्यापक, आयआयएमसी

महात्मा गांधी यांच्या विरोधातील वक्तव्यामुळे चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील भाजप माध्यम विभागाचे माजी प्रमुख अनिलकुमार सौमित्र यांची भारतीय जनसंचार संस्थेच्या (आयआयएमसी) प्राध्यापकपदी नियुक्ती झाल्यानंतर उफाळून आलेला वाद अजूनही शमलेला नसतानाच त्यांचे स्थानांतरण आता अमरावती येथील संस्थेत करण्यात आले आहे. सौमित्र यांनी महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, असे वक्तव्य गेल्या वर्षी समाजमाध्यमातून केल्यानंतर वाद उफाळून आला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आले होते.

अमरावती (Amaravati) :  महात्मा गांधी यांच्या विरोधातील वक्तव्यामुळे चर्चेत आलेले मध्य प्रदेशातील भाजप माध्यम विभागाचे माजी प्रमुख अनिलकुमार सौमित्र यांची भारतीय जनसंचार संस्थेच्या (आयआयएमसी) प्राध्यापकपदी नियुक्ती झाल्यानंतर उफाळून आलेला वाद अजूनही शमलेला नसतानाच त्यांचे स्थानांतरण आता अमरावती येथील संस्थेत करण्यात आले आहे. सौमित्र यांनी महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते, असे वक्तव्य गेल्या वर्षी समाजमाध्यमातून केल्यानंतर वाद उफाळून आला होता. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना पक्षातून निलंबितही करण्यात आले होते.

गेल्या सप्टेंबरमध्ये नवी दिल्ली येथील भारतीय जनसंचार संस्थेत प्राध्यापकपदासाठी ६० जणांची मुलाखत घेण्यात आली होती. २६ ऑक्टोबर रोजी सौमित्र यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. प्राध्यापकपदासाठी निवड झाल्याचे या पत्रात स्पष्ट करण्यात आले होते. दिल्ली येथून आता त्यांचे स्थानांतरण अमरावतीच्या संस्थेत करण्यात आले आहे. आयआयएमसीमध्ये प्राध्यापक म्हणून निवड झालेल्या अनिलकुमार सौमित्र यांनी मे महिन्यात आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ‘महात्मा गांधी हे राष्ट्राचे जनक होते, परंतु पाकिस्तानचे. त्यांच्यासारखी कोटय़वधी मुले होती भारतात, काही पात्र तर काही अपात्र. काँग्रेस पक्षाने त्यांना देशाचे जनक म्हटले आहे, परंतु राष्ट्राचे वडील नसतात. कुणी असेल, तर ते पुत्र असतील,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून भाजपवर बरीच टीका झाली, त्यानंतर पक्षाने त्यांच्याविरोधात कारवाई केली.

सौमित्र यांची प्रतिक्रिया देण्यास नकार
यासंदर्भात अनिलकुमार सौमित्र यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला. या मुद्दय़ावर काहीच बोलायचे नाही. ज्यांना मला लक्ष्य करायचे आहे त्यांनी त्यांचे काम करावे. आपण काहीच बोलणार नाही, असे सौमित्र यांनी सांगितले. भारतीय जनसंचार संस्थेचे अमरावती येथील प्रादेशिक संचालक विजय सातोकर यांनीही यासंदर्भात बोलण्यास नकार दिला.