गांजा तस्करीतील दोघांना अटक; १.१८ लाखांचा गांजा जप्त

अमरावती येथून गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री वेलकम पाईन्टजवळून अटक केली. एजाज खान छोटे खान व शेख नय्यर शेख भुरु अशी आरोपींची नावे आहे.

    अमरावती (Amravati).  गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना गाडगेनगर पोलिसांनी गुरुवारी रात्री वेलकम पाईन्टजवळून अटक केली. एजाज खान छोटे खान (39) व शेख नय्यर शेख भुरु (30, दोन्ही रा. गुलीस्तानगर) अशी आरोपींची नावे आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 1 लाख 18 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या पथकाने गुप्त माहितीवरून वेलकम पाईन्टवर सापळा रचला होता. दरम्यान दोन आरोपींपैकी एका आरोपीच्या हातात एक कथीया रंगाची लगेज बॅग होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून एजाज खान याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे 10 किलो 181 गॅम वजनाचा 1 लाख 18 रूपये किंमतीचा गांजा मिळून आला.

    पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन, त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. पोलीस आयुक्त आरती सिंह, डीसीपी शशीकांत सातव, एसीपी शिवाजी धुमाळ यांच्या मार्गदर्शनात वरीष्ठ पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले व डिबीच्या पथकाचे शेखर गेडाम, दारु देशमुख रोशन वर्हाडे, उमेश भोपते, चालक पांडूरंग बुधवंत यांनी ही कारवाई केली.