मृत शेतकरी
मृत शेतकरी

घरच्या बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्याला शेती विकावी लागली. मात्र ज्याला विकली त्याने खरेदीचे पैसेच दिले नाही; तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेतकऱ्याला मारहाणही केली. हतबल झालेला शेतकरी किमान पोलिसांकडून तरी न्याय मिळेल या आशेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेला. पण, निर्दयी पोलिसांनी त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला अमानूष मारहाण केली. दोन्ही ठिकाणी झालेला अपमान, फसवणूक आणि मारहाण यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. मृत शेतकऱ्यावर स्मशानघाटावर अंत्यसंस्कार सुरूच होते. लहान भावाने मोठ्या बंधुच्या मृतदेहाला मुखाग्नी दिली आणि तोसुद्धा जमिनीवर कोसळला.

  • मारकुंडा व्यापाऱ्याला अटक; पोलीस अधिकारी मात्र फरार

अमरावती (Amaravati). घरच्या बिकट परिस्थितीमुळे शेतकऱ्याला शेती विकावी लागली. मात्र ज्याला विकली त्याने खरेदीचे पैसेच दिले नाही; तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने शेतकऱ्याला मारहाणही केली. हतबल झालेला शेतकरी किमान पोलिसांकडून तरी न्याय मिळेल या आशेने पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायला गेला. पण, निर्दयी पोलिसांनी त्या बिचाऱ्या शेतकऱ्याला अमानूष मारहाण केली. दोन्ही ठिकाणी झालेला अपमान, फसवणूक आणि मारहाण यामुळे संतापलेल्या शेतकऱ्याने विष घेऊन आत्महत्या केली. मृत शेतकऱ्यावर स्मशानघाटावर अंत्यसंस्कार सुरूच होते. लहान भावाने मोठ्या बंधुच्या मृतदेहाला मुखाग्नी दिली आणि तोसुद्धा जमिनीवर कोसळला. हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने त्यानेही मोठ्या भावापाठोपाठ या जगाचा निरोप घेतला. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सर्जी तालुक्यातील धनेगाव येथील ही घटना. यामुळे आपसपासच्या गावातील मंडळी चांगलेच हादरले आहेत.

अंजनगाव सर्जी तालुक्यातील धनेगावातील अशोक भुयार यांची संत्रा व्यापाऱ्याने फसवणूक केली होती. एवढंच नाहीतर संत्रा व्यापारी व पोलीस उपनिरीक्षकाने मारहाण केली होती. त्यामुळे अशोक भुयार यांनी मंगळवारी सकाळी आत्महत्या केली होती. दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात गावकरी व नातेवाईकांनी आंदोलन केल्यानंतर रात्री उशिरा पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव व २ संत्रा व्यापारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

अशोक भुयार यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत होते. त्यावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन पिळवटून टाकणारा होता. मोठ्या भावाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने लहान बंधू संजय भुयार यांचा स्मशानातच हृदयविकाराच्या तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. एकाच दिवशी दोन भावाचा मृत्यू झाल्याने भुयार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

अशोक पांडुरंग भुयार या शेतकऱ्यांनी आपला संत्रा बगीच्या विकला होता. मात्र, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांला पैसे न देता उलट शेतकऱ्याला मारहाण केली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी शेतकरी गेला असता तेथेही शेतकऱ्याची तक्रार न घेता पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव यांनी शेतकऱ्याला मारहाण केली. त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली व तशी चिठ्ठी देखील लिहून ठेवली.AA

या प्रकरणी अंजनगाव सूर्जीचे पोलीस उपनिरीक्षक दिपक जाधव संत्रा व्यापारी शेख अमीन व शेख गफूर यांनी मारहाण केल्याचं CCTV मध्ये स्पष्ट झाल्याने या तिघांवर 306,34 नुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक जाधव गुन्हा दाखल होताच घटनास्थळ वरून पसार झाला आहे.  या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी करत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार असल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी सांगितले.