Allow alcohol to be made from mohafula; Demand of Gosikhurd project affected farmers to CM

भंडारा येथील गोसिखुर्द प्रकल्पबाधित एका शेतकऱ्याने उपजिवीकेचे साधन नसल्याने मोहफुलाची दारु बनविण्याच्या परवानगीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भाऊ कातोरे अस या शेतकऱ्याचे नाव आहे(Allow alcohol to be made from mohafula; Demand of Gosikhurd project affected farmers to CM).

    भंडारा : भंडारा येथील गोसिखुर्द प्रकल्पबाधित एका शेतकऱ्याने उपजिवीकेचे साधन नसल्याने मोहफुलाची दारु बनविण्याच्या परवानगीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भाऊ कातोरे अस या शेतकऱ्याचे नाव आहे(Allow Alcohol to be Made From Mohafula; Demand of Gosikhurd project affected farmers to CM).

    रस्ते पाण्याखाली गेल्याने शेती पडीक

    ‘जिल्हाधिकारी साहेब गोसेप्रकल्पाने आम्हाला शेत मालकाचे शेतमजूर बनविले. उपजीवीकेचे साधन नसल्याने मोहफूलाची दारू बनविन्याची परवानगी द्या,’ अशी संतप्त मागणी गोसिखुर्द प्रकल्पा बाधित शेतकरी भाऊ कातोरे यांनी केली आहे. भाऊ कातोरे यांनी तशा आशयाचे पत्र जिल्हाधिकारी भंडारा मार्फत चक्क मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिले आहे. भाऊ कातोरे यांची जमीन गोसिखुर्द प्रकल्पात गेली असून त्यांच्याकडे फक्त ४ एकर जमीन उरली आहे. पण मागिल काही महिन्यांपासून गोसिखुर्द धरण प्रशासनाने साठवण क्षमता वाढविली आहे. आता या शेतीकडे जाणारे रस्तेही पूर्ण पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ही शेती पडीत झाली आहे.

    जमिनी परत करा, नाहीतर परवानगी द्या

    एकीकडे शासनाने आमच्या जमिनी कवडी मोलाने घेतल्या. उरलेल्या जमिनी चुकीच्या नियोजनाने पाण्याखाली जात आहेत. याची तक्रार करुनही प्रशासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही. आता आमच्याकडे उपजीवीकेचे साधन उरलेले नाही. त्यामुळे शासनाने आमच्या जमिनी परत कराव्या. अन्यथा बॅक वॉटर जवळ मोहफुल पासून दारू बनविण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. आताच्या अर्थसंकल्पात गोसिखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी दिले असले तरी हा निधी फक्त कंत्राटदाराचे बिल काढण्यासाठी असल्याचा आरोप भाऊ कातोरे यांनी केला आहे.