प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस निघाल्यानंतर राज्यात सर्वच नियम शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेससह खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावरून जोरात धावू लागल्या होत्या.

  भंडारा (Bhandara).  कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लस निघाल्यानंतर राज्यात सर्वच नियम शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसेससह खाजगी ट्रॅव्हल्स रस्त्यावरून जोरात धावू लागल्या होत्या. मात्र काही दिवसांपासून जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात करून रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्सची संख्याही आता घटत आहे.

  अगदी काही मोजक्याच कंपनीच्या काही ठराविक गाड्या पुणे, मुंबई, नागपूर, औरंगाबाद, रायपूर, नाशिक धावत आहेत. मात्र त्यातही प्रवाशांचा प्रतिसाद अल्प असल्याने बस पूर्ण क्षमतेने भरत नाहीत त्यातच वाढत्या डिझेलचा खर्च निघणे ही अवघड झाल्याने व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. भंडारा शहरातून थेट रायपूर, नागपूर, यवतमाळ, सोलापूर, औरंगाबाद, नाशिक आदी शहरांसाठी बुकिंग होऊन काही गाड्या येथून धावत होत्या करण्याच्या आधी 20 गाड्या धावत होत्या. मात्र आता पुन्हा एकदा वाढत्या संसर्गामुळे ट्रॅव्हल्सचा व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे ट्रॅव्हलच्या फेरीही घटले आहेत.

  काही महिन्यात रुग्णांची संख्या घटल्याने खाजगी बसेस ही पूर्ण क्षमतेने धावू लागल्या होत्या. मात्र आता पुन्हा वेळेचे बंधन घातल्याने दररोज धावणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या बसेस ही भंडारा जिल्ह्यातच नव्हे, तर राज्यभरात कमी संख्येने धावत आहेत. यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायावर अवलंबून असणारे ड्रायव्हर सफाई कामगार बुकिंग एजंट तसेच खाद्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना याचा फटका बसत आहे. त्यांचे आर्थिक उत्पन्न बंद झाल्याने बँकेच्या कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत अनेक जण आहेत.

  राज्यात कोरोना संसर्ग येण्यापूर्वी ट्रॅव्हल्स व्यवसाय चांगल्या स्थितीत होता. महानगरांमध्ये तर दररोज 300 ते 400 हून अधिक ट्रॅव्हल्स धावत होत्या. भंडारा जिल्ह्यात दररोज 20 ते 25 ट्रॅव्हल्स धावतात मात्र आता करून संसर्ग वाढत आहे. त्यामुळे आणि शहरांमध्ये विविध जिल्ह्यात लगडून झाल्याने ट्रॅव्हल्स व्यवसायिक तिकीट बुकिंग करणारे चालक व वाहक यांच्या रोजगाराचा पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झाला आहे.

  दररोजचा खर्च निघणे कठीण
  कोरोनामुळे ट्रॅव्हल्स व्यवसायिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे आता पूर्वीसारखा प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने व्यावसायिकांचा दररोजचा खर्च निघणे ही अवघड झाले आहे. व्यवसायात आर्थिक भांडवल मोठे लागत असल्याने बँकांचे हप्ते कसे फेडायचे हा मोठा प्रश्न आहे आणि ट्रॅव्हल्स व्यवसायिकांची उत्पन्न घटले आहेत. आमच्या कुटुंबाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे एका ट्रॅव्हल्स व्यवसायिकाने सांगितले.