प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

धारगाव (Dhargaon). ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविस्तार अधिकारी विवेक भगत यांची एक महिन्यापूर्वी बदली झाली. तेव्हापासून येथील कारभार प्रभारीवर आहे.

    धारगाव (Dhargaon).  ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामविस्तार अधिकारी विवेक भगत यांची एक महिन्यापूर्वी बदली झाली. तेव्हापासून येथील कारभार प्रभारीवर आहे. याठिकाणी नियमित व कायमस्वरूपी ग्रामविस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

    सध्या सर्पेवाडा येथील ग्रामसेवक पी. जे. आखाडे यांच्याकडे येथील प्रभार आहे. दोन गावचा कारभार असल्यामुळे ते एका ग्रामपंचायतीला पूर्णवेळ देऊ शकत नाही. धारगावसाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे ठराविक दिवस दिले आहेत. त्यातच बैठकी, दौरे यासाठी त्यांना बाहेर जावे लागते.

    धारगाव अंतर्गत चितापूर, कान्हाळमोह ही दोन गावे येतात. त्यामुळे विद्यार्थी व शेतकरी वर्गाला रहिवासी, विवाह नोंदणी, जन्म-मृत्यू दाखले यासाठी त्यांना पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे धारगाव ग्रामपंचायतीला कायमस्वरूपी ग्रामविस्तार अधिकारी देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून  होत आहे.