अखेर गोंडसावरीत धानखरेदी केंद्र सुरू; शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेची दखल

मार्च महिना लोटूनही सरकारने गोंडसावरी येथील धानाची उचल केली नव्हती. याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर शनिवारपासून प्रत्यक्ष धानखरेदीला सुरुवात झाली.

    लाखनी (Lakhni).  मार्च महिना लोटूनही सरकारने गोंडसावरी येथील धानाची उचल केली नव्हती. याप्रकरणी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. अखेर शनिवारपासून प्रत्यक्ष धानखरेदीला सुरुवात झाली.

    मार्च महिना उजाडूनही खरीप हंगामातील धानाची उचल करण्यात न आल्याने गोंडसावरीतील शेतकरी अडचणीत सापडले होते. कष्टाने पिकवलेल्या धानाची विक्री झाल्यावर दोन पैसे खिशात येतील, या आशेवर दिवस काढत होते. तालुका खरेदी-विक्री संघाने साठवणुकीसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून धान मोजणीस असमर्थता दाखवली होती.

    यामुळे तब्बल साडेतीन हजार पोती धान उघड्यावर पडून होते. याबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धानखरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश काढले. त्यानुसार खरेदी विक्री संघाने शनिवारपासून प्रत्यक्ष धानखरेदी सुरू केली.