लाखनीत संस्थाचालकांचा परिचरावर गोळीबार, विदर्भ महाविद्यालयातील घटना

संस्थाचालक आपल्या राजकीय पक्षाचा व मोठ्या ओळखीचा फायदा घेत ते महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना नेहमी हमरीतुमरीची भाषा करून अपमानित करत अशी तक्रार महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांनी केली आहे. त्याच्या या वागण्यामुळे संपूर्ण महाविद्यालय प्रशासन वैतागले असल्याची चर्चा गावात आहे.

    भंडारा : भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरातील विदर्भ महाविद्यालयात संस्थाचालक व त्याच महाविद्यालयात भूगोल विभाग प्रमुख महाविद्यालयात कार्यरत असलेल्या परिचराला बंदुकीने गोळी झाल्याने गंभीर केल्याची घटना विदर्भ महाविद्यालयात घडली आहे. सुभाष गोपाल आगाशे असे गंभीर जखमी परिचारकचे नाव असून अमित हुकुमचंद गायधनी हे मारेकरी आहे. गायधनी हा संस्था चालक व भूगोल विभाग प्रमुख असून भाजप पक्षाचा पदाधिकारीसुद्धा आहे. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ठ असल्याचे सांगितल्या जाते.

    संस्थाचालक असलेल्या अमित हुकुमचंद गायधनी हा नवशक्ती पीठ शिक्षण संस्था मुरमाडी/सावरीमध्ये सहसचिव असून या संस्थे अंतर्गत असलेल्या विदर्भ महाविद्यालय लाखनी मध्ये भूगोल विभाग प्रमुख म्हणून प्राध्यापकसुद्धा आहे. तसेच भाजप पक्षामध्ये ही उच्चपदस्थ पदाधिकारी म्हणून कार्यरत आहे.

    संस्थाचालक आपल्या राजकीय पक्षाचा व मोठ्या ओळखीचा फायदा घेत ते महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्यांना नेहमी हमरीतुमरीची भाषा करून अपमानित करत अशी तक्रार महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापकांनी केली आहे. त्याच्या या वागण्यामुळे संपूर्ण महाविद्यालय प्रशासन वैतागले असल्याची चर्चा गावात आहे. आज संस्थेच्या कर्तव्य बजावत असताना गायधनी यांनी परिचारक सुभाष आगाशे यांच्यावर गोळी झाडली, ज्यात सुभाष च्या छातीला दुखापत होवून तो जखमी झाला आहे.

    आजही आकसापोटी सदर संस्थाचालकाने बंदुकीने गोळी झाडल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये ऐकायला मिळत आहे. जखमी झालेल्या परिचारिकाला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारा करिता हलविण्यात आले आहे. याप्रकरणी पसार होण्याच्या तयारीत असलेल्या संस्थाचालकला लाखनी पोलिसांनी भंडाऱ्यात अटक केली आहे. अद्याप गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.