टेन्शन वाढले! अबुधाबीहून दोघे प्रवासी विदर्भात; दर दोन तासांनी त्यांच्यावर ठेवला जातोय वॉच

अबुधाबीहून मोहाडी-तुमसर येथे आलेल्या दोन प्रवाशांनी भंडारा जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढवले आहे. आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवले आहे. दोघांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप वृत्त नाही. दर दोन तासांनी त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे. याशिवाय सात दिवसांनी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे (Two migrants from Abu Dhabi to Vidarbha; A watch is placed on them every two hours).

    भंडारा : अबुधाबीहून मोहाडी-तुमसर येथे आलेल्या दोन प्रवाशांनी भंडारा जिल्हा प्रशासनाचे टेन्शन वाढवले आहे. आहेत. जिल्हा प्रशासनाने संबंधित प्रवाशांना गृह विलगीकरणात ठेवले आहे. दोघांपैकी कोणालाही कोरोनाची लागण झाल्याचे अद्याप वृत्त नाही. दर दोन तासांनी त्यांच्यावर वॉच ठेवण्यात येत आहे. याशिवाय सात दिवसांनी त्यांची आरटीपीसीआर टेस्ट केली जाणार आहे (Two migrants from Abu Dhabi to Vidarbha; A watch is placed on them every two hours).

    दरम्यान, अवघ्या जगावर दहशत पसरविणारा कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन आता महाराष्ट्राच्या वेशीवर धडकला आहे. कर्नाटकात ओमायक्रॉनचे दोन रुग्ण सापडल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. गेल्या चोवीस तासात हे दोन रुग्ण सापडल्याचे स्पष्ट करण्यात आले.

    महाराष्ट्रात आफ्रिकेतून आलेले 9 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. महाराष्ट्रासह देशभरात आफ्रिकेतून आलेल्या आणि येणाऱ्यांवर प्रशासनाचा वॉच आहे(New Covid variant Omicron: Omicron at the gates of Maharashtra; Two patients found in Karnataka).