सरकी लाईन भागातून १.३३ लाखांचा गुटखा जप्त; खामगाव पोलिसांची कारवाई

खामगाव येथील सरकी लाईन भागातील एका व्यापारी संकुलातून 1 लाख 33 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली.

    खामगाव (Khamgaon).  सरकी लाईन भागातील एका व्यापारी संकुलातून 1 लाख 33 हजार रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. शहर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. खरेदी विक्री संस्थेचे कार्यालय असलेल्या व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा साठवून ठेवला असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली.

    या माहितीच्या आधारे शहर पोलिसांच्या पथकाने व्यापारी संकुलात धाड टाकली. त्यावेळी संकुलातील दुकान नं. 3 मध्ये एक लाख 33 हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. पोलिसांनी चौकशी केली असता हे दुकान राहुल देशमुख रा. घाटपुरी याने भाड्याने घेतल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी राहुल देशमुख यास ताब्यात घेतले असून देशमुख विरोधात गुन्हा दाखल केला. ही कारवाई शहर पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात पीएसआय ईश्वर सोळंके हे.काँ. बोरसे, पोलीस नायक वाघ, प्रफुल्ल टेकाडे, पोकाँ निळे यांनी केली.