सासरच्या जाचाला कंटाळून 20 वर्षीय महिलेची गळफास घेत आत्महत्या

लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून शारीरिक, मानसिक छळ केला जायचा. हा त्रास असह्य झाल्याने 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

    बुलडाणा : नवरा तसेच सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. शेगाव तालुक्यातील कठोरा येथील ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

    सासरच्या मंडळींकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून एका 20 वर्षीय महिलेने आत्महत्या केली. गळफास लावून या महिलेने स्वत:ला संपवलं. लग्नात हुंडा न दिल्यामुळे तसेच वेगवेगळे कारण दाखवून या महिलेचा सासरच्या मंडळींकडून शारिरीक आणि मानसिक छळ केला जायचा, असा आरोप केला जातोय. महिलेच्या मृत्यूनंतर जलंब पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. कठोरा येथे ही घटना घडली.


    मिळालेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील कठोरा येथे 20 जानेवारीला एका विवाहितेने गळफास घेत आयुष्य संपवले. सासरच्या मंडळाकडून तिचा सतत छळ करण्यात येत होता. लग्नात हुंडा मिळाला नाही म्हणून शारीरिक, मानसिक छळ केला जायचा. हा त्रास असह्य झाल्याने 20 वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. गळफास घेण्यापूर्वी या विवाहितेने आपल्या नातेवाईकाला व्हिडीओ कॉल करून सर्व घटना ऐकवली आणि गळफासाचे फोटो काढून आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, सासरा, दीराला जलंब पोलिसांनी गुन्हा दाखल करून बेड्या ठोकल्या आहेत.