Additional Superintendent of Police cracks down on sellers of banned nylon cats

मकर संक्रांतीच्या या पर्वावर नायलॉन मांजाची विक्री छुप्या पद्धतीने होतांना दिसते. याला आळा घालण्यासाठी खामगावच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आता कंबर कसली आहे.

    खामगाव : मकर संक्रांत उद्यावर येऊन ठेपली असतांना पतंग उडविण्यास सगळेच उत्सुक असतात. सध्या कोरोचा मारा सुरु असतांना विरंगुळा म्हणून सगळेच पतंग उडवीत आहेत. परंतु, पतंग उडविण्यासाठी लागणार मांजा हा नायलॉनचा नसावा. कारण, नायलॉन मांजाचे दुष्परिणाम बरेच आहेत. ही बाब लक्षात घेऊन शासनाने नायलॉन मांजाच्या विक्री व वापरावर बंदी घातली आहे. मात्र, या नियमांची अवहेलना करून प्रतिबंधित असलेला मांजा सर्रास विकल्या जात असल्याने खामगाव येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाची कारवाईस सुरुवात केली आहे. 
    मकर संक्रांतीच्या या पर्वावर नायलॉन मांजाची विक्री छुप्या पद्धतीने होतांना दिसते. याला आळा घालण्यासाठी खामगावच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षकांच्या पथकाने आता कंबर कसली आहे. आज सकाळ पासून सुरु केलेल्या कारवाईत हजारो रुपयांचा नायलॉन मांजा त्यांनी जप्त केला आहे. 
    आज पोलिसांनी खामगाव शहरातील पतंग विक्री मार्केटमध्ये टाकलेल्या धाडीमध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांच्याकडून ३७ हजार ५०० रुपयांचा मांजा व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. मांजाच्या विक्रीवर बंदी असतांना सुद्धा छुप्या मार्गाने त्याची विक्री करीत असल्याची  माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने या ठिकाणी छापा टाकून ही कारवाई केली. 
    पोलिसांच्या या कारवाईत काही आरोपीना अटक करण्यात आलेली आहे. या मध्ये जितेंद्र उत्तमचंद गोयल ( ३५ ), रवि रतन चौव्हान (३२), चेतन मुकेश चव्हान (२४), दिनेश फुलचंद पवार (५५)  यांचा समावेश आहे. हे सर्व खामगांव येथील रहिवासी आहे.