तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न; ‘स्वाभिमानी’चे आंदोलन भडकले

    बुलडाणा (Buldana) : ‘स्वाभिमानी’चे आंदोलन पेटले आहे. बुलडाण्यात स्वाभीमानीच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. संतप्त आंदोलकांकडून तहसीलदारांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला. गेल्या तीन दिवसांपासून हे आंदोलन सुरु आहे. (Violent agitation by Swabhimani activists at Buldana)

    दरम्यान, रविकांत तुपकांनी अन्नत्याग केल्याने त्यांची प्रकृती खालावलीये. दरम्यान काल रात्री जवळपास तासभर चिखली – बुलडाणा राज्य महामार्गवर स्वाभिमानीकडून रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे प्रशासनाची तारांबळ उडाली होती.

    एवढे सुरू असतांना एकीकडे पोलिसांची गाडी फोडण्यात आली तर दुसरीकडे तहसीलदारांचे वाहन पेटवून देण्याचा प्रयत्न देखील झाल्याने आता या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसून येत आहे.