प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

देऊळगाव येथील भाजपाच्या नगराध्यक्ष सुनीता शिंदे, नगरसेविका पल्लवी वाजपे, नगरसेविका मालनबी समशेर खान पठाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

    देऊळगाव (Deulgaon).  भाजपाच्या नगराध्यक्ष सुनीता शिंदे, नगरसेविका पल्लवी वाजपे, नगरसेविका मालनबी समशेर खान पठाण यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सिंदखेड राजा मतदार संघाचे माजी आमदार शशिकांत खेडेकर उपस्थित होते.

    नगराध्यक्षांच्या निवडणुका भाजपाने थेट जनतेतून घेतल्या होत्या. त्यामध्ये भाजपाच्या तिकिटावर सुनीता शिंदे जनतेमधून निवडून आल्या होत्या. मात्र, देऊळगाव राजा नगरपालिकेमध्ये भाजपाकडे बहुमत नसल्याने अखेर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नगरपालिकेमध्ये एकूण 17 सदस्य आहेत. शिवसेना 5, काँग्रेस 4, राष्ट्रवादी काँग्रेस 4, भारतीय जनता पक्ष 4 सदस्य निवडून आले होते. परंतु सध्या सुनीता शिंदे, पल्लवी वाजपेयी आणि मालनबी पठाण यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्यामुळे भारतीय जनता पक्षाला सिंदखेड राजा मतदारसंघात खिंडार पडले आहे.

    देऊळगाव राजा नगरपालिकेमध्ये भाजपाचा फक्त 1 सदस्य उरला आहे. भाजपाचे नगराध्यक्ष व नगरसेवक अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या संपर्कात होते. त्यामुळे अखरे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन हाती बांधले.