बुलडाणा: अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण; स्वाभिमानीचे रविकांत तुपकर अटकेत

कापूस आणि सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी बुलडाणा पोलिस ठाण्यात 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी दुपारी बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्वरी आणि इतर पाच जणांना अटक केली(Buldana: Violent turn to the hunger strike movement; Swabhimani's Ravikant Tupkar arrested ).

    बुलडाणा : कापूस आणि सोयाबीन आंदोलन हिंसक झाल्याप्रकरणी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर यांना अटक करण्यात आली. याप्रकरणी बुलडाणा पोलिस ठाण्यात 21 नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी दुपारी बुलडाणा पोलिसांनी तुपकर यांच्यासह त्यांच्या पत्नी शर्वरी आणि इतर पाच जणांना अटक केली(Buldana: Violent turn to the hunger strike movement; Swabhimani’s Ravikant Tupkar arrested ).

    कापूस आणि सोयाबीनच्या दरवाढीसाठी तुपकर यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. अन्नत्याग आंदोलनामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते.

    एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळले. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या होत्या.