बुलडाण्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांनी केले जिजाऊंचे पूजन, शासकीय पूजन संपन्न

यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांना आदर्श मानून आज देशात आणि राज्यात अनेक राज्यकर्ते राज्य करत आहेत. अशा महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊंचा आज जन्मोत्सव. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व जिजाऊ सिंदखेडला न येता आपल्या घरातूनच जिजाऊंना वंदन वरावं.’ असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.

    बुलडाणा : आज १२ जानेवारीला सिंदखेड राजा येथील ४२४ वा जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त राजवाड्यातील जिजाऊंच्या पुतळ्याचे पूजन करून जन्मोत्सवाला सुरवात झाली. आज सकाळी बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि माँसाहेब जिजाऊंच्या वंशजांनी पूजन केलं. यावेळी शासकीय पूजा ही संपन्न झाली. पुजनवेळी जिजाऊ भक्त उपस्थित होते. यावेळो जय जिजाऊ जय जिजाऊ च्या घोषणांनी परिसर दणाणला होता.

    यावेळी बोलताना पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे म्हणाले की, ‘शिवाजी महाराजांना आदर्श मानून आज देशात आणि राज्यात अनेक राज्यकर्ते राज्य करत आहेत. अशा महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊंचा आज जन्मोत्सव. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्व जिजाऊ सिंदखेडला न येता आपल्या घरातूनच जिजाऊंना वंदन वरावं.’ असं आवाहन शिंगणे यांनी केलं आहे.

    दरवर्षी मोठ्या थाटात साजरा होणारा जिजाऊ जन्मोत्सव सोहळा यावर्षी कोरोनामुळे अगदी साध्या पद्धतीने साजरा होतोय. मराठा सेवा संघाने आवाहन केल्यानुसतार ह्यावर्षी फक्त ५० लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होत आहे. त्यामुळे जिजाऊ भक्तांची ह्यावर्षी गर्दी याठिकाणी पहायला मिळणार नाही. मात्र जिजाऊ जन्मोत्सव असल्याने राजवाडा आणि जिजाऊ सृष्टीवर विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. शिवाय घरीच राहून जिजाऊंना मानवंदना करावी असे आवाहन पालकमंत्री शिंगणे यांनी केलं आहे.