राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जन्मोत्सव सोहळा उत्साहात; जिजाऊंच्या १३ व्या वंशजांनी केले महापूजन

कोरोनाचे निर्बंध असल्याने हा उत्सव मोजक्याच ५० जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी आज सकाळी साडेपाच वाजता जिजाऊंच्या १३ व्या वंशजांनी विधिवत महापूजन केले.

    बुलढाणा : सिंदखेडराजा येथे राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी आज १२ जानेवारी राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस यानिमित्ताने पहाटे साडेपाच वाजता जिजाऊंच्या १३ व्या वंशजांनी महापूजन केले. यावेळी कोरोनाचे निर्बंध असल्याने मोजक्याच ५० जणांना प्रवेश देण्यात आला. महापूजन झाल्यानंतर माँ जिजाऊ यांना वंदन करण्यात आले. शासकीय पूजन ( Government Worship ) झाल्याने कोरोना निर्बंधांमुळे लगेच राजवाडा बंद करण्यात आला.

    कोरोनाचे निर्बंध असल्याने हा उत्सव मोजक्याच ५० जणांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. राजे लखोजी जाधव यांच्या राजवाड्यातील जन्मस्थळी आज सकाळी साडेपाच वाजता जिजाऊंच्या १३ व्या वंशजांनी विधिवत महापूजन केले. शांततेत आणि मोजक्याच पूजेचा कार्यक्रम करण्यात आला. कुठलाही गाजावाजा करण्यात आला नाही. तत्पूर्वी मात्र, माँ जिजाऊ यांच्या राजवाड्यावर आणि माँ साहेब यांच्या सुष्टीवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. जिजाऊ उत्सवाला येणाऱ्या प्रत्येकाचे आरटीपीसीआर टेस्ट आणि लसीचे दोन्ही डोस असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक केले होते. त्यामुळे तिसऱ्या वर्षीही जिजाऊ जन्मोत्सव साध्यापद्धतीने साजरा झाला.