नाफेड’ हरभरा खरेदी केंद्रास प्रारंभ

बुलडाणा तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीद्वारे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या वतीने नाफेड हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते काटा पूजन करून 22 मार्च रोजी करण्यात आले.

    बुलडाणा. बाजार दरापेक्षा शासकीय खरेदीचे हरभऱ्याचे दर चारशे ते पाचशे रुपयांनी जास्त आहेत व पैसेदेखील एका आठवड्यात मिळणार आहेत. सद्या आभासी पध्दतीने नोंदणी सुरू आहे. तरी शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त नोंदणी करून संधीचा लाभ घेत आर्थिक फायदा करून घेण्याचे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी केले.

    बुलडाणा तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समितीद्वारे महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन, मुंबई यांच्या वतीने नाफेड हरभरा खरेदी केंद्राचे उद्घाटन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते काटा पूजन करून 22 मार्च रोजी करण्यात आले. याप्रसंगी प्रथम कास्तकार भास्कर भिवसन शेळके-खेर्डी व संजय पंडित-तांदूळवाडी यांचा रूमाल, टोपी व नारळ देऊन आ. संजय गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमाला संस्थाध्यक्ष नंदकुमार खडके, उपाध्यक्ष सखाराम नरोटे, जिल्हा पणन अधिकारी पी.एस.शिंगणे, संस्थाचालक कडूबा पवार, विनायक गोडबोले, डॉ. शिवाजी निकम, अश्रुजी अंभोरे, राजाराम कानडजे, दगडू गाडेकर, रंगराव गायकवाड, ओमसिंग राजपूत, रवी, पाटील, तसेच कास्तकार बांधव उपस्थित होते.