वय अवघं ६ वर्ष, पण ‘लाखो मनावर तिचं साम्राज्य’; इन्स्टाग्रामवर फाॅलोअर्सची संख्या पाहून तुमचेही डोळे विस्फारेल

शेगावच्या कादंबरी ढमाळ (Kadambari Dhambal) या सहा वर्षीय चिमुकलीने सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घातला आहे. या चिमुकलीच्या महापुरूषांचा इतिहास उलगडणारे व्हिडिओ (The video revealing the history) चांगलेच व्हायरल होत आहे.

    बुलढाणा (Buldhana). शेगावच्या कादंबरी ढमाळ (Kadambari Dhambal) या सहा वर्षीय चिमुकलीने सध्या सोशल मीडियावर (social media) धुमाकूळ घातला आहे. या चिमुकलीच्या महापुरूषांचा इतिहास उलगडणारे व्हिडिओ (The video revealing the history) चांगलेच व्हायरल होत आहे. सोबतच कादंबरीचे जोक्स , डान्स, लावण्यांचे व्हिडिओसुद्धा (the jokes, dances and videos of the novel) सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या या प्रसिद्धीमुळे इन्स्टाग्राम १.९ मिलियन फॉलोवर्स (Instagram followers) तिला जोडले गेले आहेत.

    बुलढाणा जिल्ह्याच्या प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगाव येथील ही सहा वर्षीय चिमुकली असून सध्या कादंबरी के.जी. २ मध्ये शिकत आहे. इंस्टाग्रामवर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडिओ बघत असताना कादंबरीला ते आवडले आणि तिनेही तिच्या वडिलांकडे श्रद्द्दा शिंदे सारखे व्हिडिओ बनवण्याचा हट्ट केला. तेव्हापासून कादंबरीने व्हिडिओ बनवायला सुरुवात केली.

    हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडिओमुळे परिसरात ती घरा-घरात पोहचली. विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तीचे कौतूकही होत आहे. नुकतेच अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडिओ चांगलाच गाजला आहे. सध्याच्या काळात लहान मुलांना टीव्ही, मोबाईलचे व्यसन जडले असताना, या चिमुकलीला महापुरूषांच्या विचारांवर आधारित अभिनय करावासा वाटणे, हे नक्कीच गौरवास्पद म्हणावे लागेल.

    शेगावचा धमाळ परिवारही तसा पुरोगामी विचारांचा असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कांदबरीवर चांगले संस्कार केले आहेत. घरून प्रोत्साहन मिळत असल्याने आपल्या अभिनय कौशल्यातुन कादंबरी अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या घरच्यांना वाटतोय. कारण शिक्षणाबरोबरच इतिहासाचे धडेही तीला देण्यात येत आहेत. कादंबरीच्या या कामगिरीवर देशभरातून विशेष म्हणजे नामवंत मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक आदींनी तिचे व्यक्तिशः कौतुक देखील केले आहे.