शेगावात वादळी वा-यासह पाऊस; घरावर कोसळले झाड

सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. याबाबत माहिती अशी की गेल्या दोन-तीन दिवसांपासून शेगाव शहरात वातावरण अचानक बदलल्याने पावसाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. 20 मार्च शनिवारी संध्याकाळी शेगाव शहरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडालेली दिसत होती.

    शेगाव. शहर व परिसरात 20 आणि 21 मार्चरोजी रात्री दरम्यान वादळी वा-यासह पाऊस कोसळला स्थानिक भोईपुरा भागातील घरावर झाड कोसळल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती.

    सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. याबाबत माहिती अशी की गेल्या दोन-तीन दिवसांपासून शेगाव शहरात वातावरण अचानक बदलल्याने पावसाचे वातावरण निर्माण झालेले दिसत आहे. 20 मार्च शनिवारी संध्याकाळी शेगाव शहरात वादळी वा-यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडालेली दिसत होती. 21 मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान गडगडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. येथील नागझरी रस्त्यावरील भागात विजय जानराव राजगुरे यांच्या घरावर लिंबाचे झाड कोसळून घराचे मोठे नुकसान झाले सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही अप्रिय घटना घडली नसून दुखापत सुद्धा कोणाला झाली नाही.

    या घटनेची माहिती परिसरातील उमेश राजगुरे यांनी शेगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष  शकुंतलाबाई बुच व नगरपालिका उपाध्यक्ष व भोईपुरा भागातील नगरसेविका  सुषमा शेगोकार यांना दिली. तत्काळ नगरपालिकेने घरावर पडलेले झाड हटविले नुकसानग्रस्त राजगुरे यांना मदत मिळावी अशी मागणी या परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.