पालक घरी नसल्याने जाणून गतिमंद मुलीवर बलात्कार; गावकऱ्यांमध्ये संतापाची लाट

    चिखली (Chikhali) : घरात एकटी असल्याची संधी साधून एका १९ वर्षीय गतिमंद मुलीवर दोघांनी बलात्कार केल्याची (girl raped by two men) घटना शुक्रवारी अमडापूरमध्ये (Amdapur) समोर आली. याप्रकरणी शेख इलियास शेख सत्तार (Sheikh Ilyas Sheikh Sattar) (५७) व चाँद खाँ रहीम खाँ (Chand Khan Rahim Khan) (५५) या दोघांना अटक करण्यात आली आहे.

    चिखली तालुक्यात अमडापूर हे गाव येते. गावातील ४६ वर्षीय महिला नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेली असताना तिची गतिमंद मुलगी घरी होती. ही संधी साधून हे दोघे घरात शिरले. दोघांनी तिच्यावर अत्याचार केला. याच सुमारास पीडितेची आई शेतातून घरी आली असता दोघांनी पळ काढला. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितल्यानंतर मायलेकींनी पोलिस ठाणे गाठले.

    तक्रार दिल्यानंतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली. शुक्रवारी या दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाचा पीसीआर देण्यात आला. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक प्रवीण सोनवणे करीत आहेत.