रेशन घेऊन जाणारा ट्रक उलटला; दोघे जखमी

खामगाव येथून शेगावमार्गे रेशनचा माल संग्रामपूरकडे घेऊन जाणारा ट्रक शेगाव वरवट रोडवर उलटल्याने ट्रक चालक-वाहक दोघेही किरकोळ जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच 40-बीएल 7043 मध्ये रेशनचा 20 टन माल खामगावहून संग्रामपूरकडे घेऊन जात असताना 20 मार्च रोजी संध्याकाळी ट्रक उलटला. चालक आणि क्लिनर या दोघांना किरकोळ मार लागला.

    शेगाव (Shegaon ).  खामगाव येथून शेगावमार्गे रेशनचा माल संग्रामपूरकडे घेऊन जाणारा ट्रक शेगाव वरवट रोडवर उलटल्याने ट्रक चालक-वाहक दोघेही किरकोळ जखमी झाले. प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक एमएच 40-बीएल 7043 मध्ये रेशनचा 20 टन माल खामगावहून संग्रामपूरकडे घेऊन जात असताना 20 मार्च रोजी संध्याकाळी ट्रक उलटला. चालक आणि क्लिनर या दोघांना किरकोळ मार लागला.

    घटनेची माहिती मिळाल्याने संग्रामपूर तहसील कार्यालयातील संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी अपघातग्रस्त ट्रकमधील रेशन दुसऱ्या वाहनात टाकून रवाना केले. यामुळे मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. परंतु वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून उलटलेल्या वाहनातून दुसऱ्या वाहनात माल त्वरित टाकण्यात आला. पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने त्यांनी वाहतूक सुरळीत केली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.