Terrible loss to farmers in Vidarbha; Soybean-urad crop under water

विदर्भात पावसाचा कहर सुरु आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटले आहेत. त्‍यामुळे शेतकरी चिंताग्रस्‍त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

    बुलडाणा : विदर्भात पावसाचा कहर सुरु आहे. बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटले आहेत. त्‍यामुळे शेतकरी चिंताग्रस्‍त झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.

    बुलडाणा जिल्ह्यातील येळगाव धरण ओव्हरफ्लो झाल्याने पैनगंगा नदीला मोठा पूर आला. त्यामुळे पेठच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने चिखली – खामगाव रस्ता १२ तासांच्या नंतरही चालू झाला नसून दोन्ही बाजूनी वाहतूक थांबली. तर, पैनगंगा नदीला पूर आल्याने नदीकाठावरील शेतात पाणीच पाणी झाले.

    शेतात उभ्या असलेल्या पिकांत पाणी घुसले. त्यामुळे पिकेही पाण्याखाली आली. शेती पूर्णपणे वाहून गेली आहे. चिखली, बुलडाणा, मेहकर तालुक्यातुन ही नदी जात असल्याने तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले. तर दिवठाणा, उत्तरादा, पेठ गावातील शेतकऱ्यांचे ही नुकसान झाले आहे.