
बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष टवरे (रा. एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) असे मृत तरुणाचे नाव .....
बुलढाणा (Buldhana) : बुलढाण्यात डोंगराच्या पायथ्याशी एका 32 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. तरुणाच्या शरीरावर रक्ताचे डाग असल्याने घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. आहे. मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काय आहे प्रकरण?
बुलढाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यातील गारडगाव शिवारातील डोंगराच्या पायथ्याशी 32 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह गावातील नागरिकांना आढळून आला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संतोष टवरे (रा. एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) असे मृत तरुणाचे नाव असल्याचे त्याच्याजवळ मिळालेल्या आधार कार्डावरुन समजले आहे.
मृतदेहाजवळ गुलाब, ब्लाऊजही
मृतदेहाजवळ दारुची छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि एक अगरबत्तीचा पुडाही आढळून आल्याने ही घटना घातपात असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
मृतदेह कसा सापडला?
खामगाव तालुक्यातील गारडगाव शिवारात डोंगराळ भाग असून या ठिकाणी दुपारी शेतकरी आपल्या शेतात गेले होते. तेव्हा तिथे 32 वर्षीय तरुण मृतावस्थेत आढळला. याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला.
आत्महत्या की घातपात?
यावेळी घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेहापासून काही अंतरावर चप्पल, दारुची एक छोटी बॉटल, एक गुलाबाचे फूल, ब्लाऊज आणि उदबत्तीचा एक पुडा असे साहित्य आढळून आल्याने तेही पोलिसांनी घटनास्थळावरुन जप्त केले. तर यावेळी आधार कार्ड मिळून आल्याने यावरुन मयत तरुणाचे नाव संतोष टवरे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र ही घटना आत्महत्या आहे की घातपात? याविषयी अद्याप स्पष्टता नाही.