पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत; पंकजा मुंडे

    बुलढाणा (Buldhana) : जिल्ह्यातील दुसरबीड येथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांची खदखद समोर आल्याचं पाहायला मिळाली.भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना अप्रत्यक्षरीत्या टार्गेट करत.पदासाठी कुणासमोर हात फैलावण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाही असं वक्तव्य करत आपली नाराजी त्यांनी पुन्हा एकदा उघड केली आहे.

    माझं विश्व, माझे माता-पिता, माझं सर्वस्व जनता आहे.तुम्हाला दहा परिक्रमा करेल अजून कुठल्या प्रतिक्रमाची मला आवश्यकता नाही.एखाद्या गरीब फाटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेऊन नतमस्तक होईल.पण कुठल्या पदासाठी हाथ फैलावून मागणी करण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत.असं म्हणत पंकजा मुंडेंनी आपल्या मनातील खदखद पुन्हा एकदा मांडली आहे.