शेगाव-पंढरपूर रस्त्यावर दुचाकीस्वाराचा मृत्यू; ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

शेगाव-पंढरपूर महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. लोणार-मंठा रोडवर माऊली गॅरेजजवळ पुलासाठी खोदून ठेवलेल्या खड्या्यमध्ये आठवडाभरात दोन दुचाकीस्वार पडल्याने एकाचा मृत्यू झाला.

    लोणार (Lonar).  शेगाव-पंढरपूर महामार्गाचे काम धिम्या गतीने सुरू आहे. लोणार-मंठा रोडवर माऊली गॅरेजजवळ पुलासाठी खोदून ठेवलेल्या खड्या्यमध्ये आठवडाभरात दोन दुचाकीस्वार पडल्याने एकाचा मृत्यू झाला. यास ठेकेदार जबाबदार असून ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

    पालखी महामार्गाचे काम दोन वर्षांपासून सुरू आहे. संबंधीत ठेकेदाराकडून कामामध्ये दिरंगाई होत असल्याचा आरोप होत आहे. अनेक नागरिक तसेच पदाधिकाऱ्यांनी तक्रारी देऊनही अद्याप कारवाई झाली नाही. आठ दिवसांपूर्वी लोणारवरून मंठाकडे जात असताना रात्रीच्या वेळी खड्डा न दिसल्याने दोघेजण पडले. यामध्ये कोकरबा येथील गणेश पिसे 21 हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले होते.

    उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर 25 मार्चच्या सायंकाळी शहरातील एक मोटारसायकलस्वार खड्याायमध्ये पडल्याने गंभीर जखमी झाला. ठेकेदाराला यासाठी जबाबदार धरून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.