चंद्रपूर आगारातील १४ कर्मचारी निलंबित; एसटी महामंडळाने उगारला कारवाईचा बडगा

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं (the Maharashtra State Transport Corporation) नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत विविध मागण्यांसाठी संप करणार्‍या चंद्रपूर विभागातील वाहतूक नियंत्रकासह १४ कर्मचार्‍यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आलं आहे.

    चंद्रपूर (Chandrapur) : राज्यभरातील विविध ठिकाणी सुरू असलेला एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST bus strike) आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं (the Maharashtra State Transport Corporation) नुकसान आणि प्रवाशांचे हाल होत असल्याचा ठपका ठेवत विविध मागण्यांसाठी संप करणार्‍या चंद्रपूर विभागातील वाहतूक नियंत्रकासह १४ कर्मचार्‍यांचे मंगळवारी निलंबन करण्यात आलं आहे. निलंबन काळात संबंधित कर्मचार्‍यांनी आगार व्यवस्थापक यांच्या कार्यालयात हजेरी लावण्याचे आदेश चंद्रपूर विभागाच्या वाहतूक अधीक्षकांनी दिले आहेत.

    या कारवाईने राज्य परिवहन महामंडळाच्या चंद्रपूर विभागातील कर्मचार्‍यांकडून प्रचंड रोष व्यक्त केला जात आहे. संप करणार्‍या अन्य कर्मचार्‍यांवर निलंबनाची टांगती तलवार उभी असल्याची शक्यता रापमच्या चंद्रपूर विभागात आहे. निलंबित कर्मचार्‍यांमध्ये चंद्रपूर विभागातील चंद्रपूर, वरोडा, राजुरा व चिमूर आगारातील विविध पदांवर काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा समावेश आहे.