नागाने गिळली सशाची १६ पिल्लं; घटना कॅमऱ्यात कैद, गावकरी थक्क

शेतकरी दिवाकर चौधरी यांनी त्यांच्या घरी एका ससा पाळला होतो. या सशाने नंतर पिल्लांना जन्म दिला होता. विशेष. याच पिल्लांना सापाने गिळंकृत केले. या क्रुर सापाचा सगळा कारानामा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे.

    चंद्रपूर (Chandrapur) : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) मूल तालुक्यातील (Mul taluka) करवन गावात (Karwan village) विचित्र घटना घडली आहे. एका सापाने पाळीव सशाची (pet rabbit) पिल्ले चक्क गिळंकृत केली आहेत. बरं या सापाने एक किंवा दोन नाही तर चक्क 16 पिल्लांचा फडशा पडला आहे.

    या सापाने गिळंकृत केलेली सर्व पिल्ले नंतर सापाने बाहेरदेखील टाकली आहेत. हा आश्चर्यचकित करणारा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात आलाय. सापाचा हा प्रताप सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठऱतोय.

    तब्बल 16 पिल्लांचा फडशा पाडला
    मिळालेल्या माहितीनुसार हा प्रकार जिल्ह्यातील मूल तालुक्यातील करवन गावात घडला. या गावात शेतकरी दिवाकर चौधरी यांनी त्यांच्या घरी एका ससा पाळला होतो. या सशाने नंतर पिल्लांना जन्म दिला होता. विशेष. याच पिल्लांना सापाने गिळंकृत केले. या क्रुर सापाचा सगळा कारानामा कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सापाने पिल्लांना गिळंकृत करुन मोठ्या सशालादेखील दंश केला आहे. या सापाने तब्बल 16 पिल्लं गिळून घेतल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

    सशालाही केला दंश
    रात्रीच्या अंधारात सापाने हा कारमाना केला आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर शेतकरी दिवाकर चौधरी यांनी तत्काळ सर्पमित्राला पाचारण केले. त्यानंतर घटनास्थळी दाखल होत सर्पमित्राने त्या सापाला पकडले. त्यानंतर सापाने गिळून घेतलेली सर्वच्या सर्व म्हणजेच तब्बल 16 पिल्लं पोटातून बाहेर काढली. हा सर्व प्रकार ऐकून लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. उंदीर, बेडूक तसेच इतर छोटे प्राणी सापाचे भक्ष्य असतात. मात्र, तब्बल 16 पिलांचा एका नागाने फडशा पाडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.