The danger increased even more; Corona becomes 'Delta Plus'

नव्याने आढळलेले 20 रुग्णांमध्ये अकोला आणि चंद्रपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. अन्य रुग्णांमध्ये मुंबई 7, पुणे 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. आता पर्यंत राज्यात आढळलेल्या 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत.

    चंद्रपूर : कोरोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनांचा एक अविभाज्य भाग म्हणून कोरोनाविषाणूचे जनुकीय क्रमनिर्धारण ( जिनोमिक सिक्वेंसिंग) नियमित स्वरुपात केले जात आहे. बुधवारी सीएसआयआर, आयजीआयबी प्रयोगशाळेने आणखी 20 डेल्टा प्लस रुग्ण शोधले असून त्यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या डेल्टा प्लस रुग्णांची(delta plus variant in maharashtra) संख्या ६५ वर पोहोचली आहे.

    नव्याने आढळलेले 20 रुग्णांमध्ये अकोला आणि चंद्रपूर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. अन्य रुग्णांमध्ये मुंबई 7, पुणे 3, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर प्रत्येकी 2 रुग्णांचा समावेश आहे. आता पर्यंत राज्यात आढळलेल्या 65 डेल्टा प्लस रुग्णांपैकी 32 पुरुष असून 33 स्त्रिया आहेत.

    सर्वाधिक 33 डेल्टा प्लस रुग्ण 19 वर्षे ते 45 वर्षे वयोगटातील आहेत तर त्या खालोखाल 46 ते 60 वर्षे वयोगटातील 17 रुग्ण आहेत. यामध्ये 18 वर्षांखालील 7 बालके असून 60 वर्षांवरील 8 रुग्ण आहेत.